

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने भंडारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत ते भंडारा विधानसभेचे आमदार राहिले.
शुक्रवारी भंडारा येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत ते उपस्थित होते. शनिवारी दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे निधन झाले.