विदर्भ

चंद्रपूर, ब्रम्हपुरीचे तापमान चौथ्या दिवशीही राज्यात हॉट

अविनाश सुतार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="see more web stories " circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर राज्यभरातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परंतु मागील चार दिवसांपासूलन राज्यात पुन्हा असह्या उकाडा निर्माण झाला असून वातावरण तापत चालले आहे. देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर, ब्रम्हपूरी मध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. ह्या दोन्ही ठिकाणी आज (दि.१४) एका अंशाने तापमानात वाढ झाली आहे. चंद्रपूर 43.2 तर ब्रम्हपुरी 43.0 अंश सेल्सिअस अशी नोंद घेण्यात आली आहे. राज्यात सर्वात हॉट तापमान या ठिकाणी आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यात सूर्य आग ओकत असल्याने मे आणि जूनमध्ये कडक उन्हाचा सामना करावा लागण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे.

चार दिवसांपासून राज्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. आज चंद्रपूर व ब्रम्हपूरी येथील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथील अनुक्रमे 42.2 तर ब्रम्हपुरी 42 अंश सेल्सिअस तापमानची नोंद घेण्यात आली होती. यामध्ये एका अंशाने दोन्ही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. तर त्यापाठोपाठ अकोला, अमरावती, वर्धा व यवतमाळनेही चाळीशी ओलांडली होती. याही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.

आज चंद्रपूर व ब्रम्हपूरी येथील तापमानाने बुधवारच्या तापमानाला मागे टाकीत अनुक्रमे 43.2 व 43.0 अशी नोंद दोन्ही ठिकाणी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर व ब्रह्मपुरी मधील तापमानात सतत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन व्हायला लागत आहे. त्यापाठोपाठ अकोल्यामध्ये 40.3 नोंद घेण्यात आली. एका अंशाने तापमान कमी झाले आहे. अमरावतीचे तापमान 41.4 असे कायम आहे. वर्धेतील तापमान 1. 1 अंशाने वाढून 42.2 ची नोंद घेण्यात आली. तर यवतमाळ 41.0 असणारे तापमान 0.5 अंशाने कमी झाले आहे. गोंदिया 40.4 मधील तापमान जैसे थे आहे. नागपूर मध्ये 41.0 ची नोंद घेण्यात आली. बुलढाणा, गडचिरोली व वाशीम येथील तापमान चाळीशी आत आहे.

मराठवाड्यातील परभणी 40.2, उस्मानाबादा 39.0, औरंगाबाद 38.7 अशी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणीही पारा दिवसागणीक वाढत आहे. सध्या तरी मराठवाडा चाळीशीच्या आत आहे. जळगाव आणि सोलापूरने चाळीस ओलांडली आहे. दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे 41.3, तर 40.8 असे तापामान आहे. नाशिक, सांगली सातारा व पुणे चाळीशीकडे वाटचाल करीत आहेत. थंड हवेचे ठिकाणी महाबळेश्वर मध्ये तापमान तीसच्या अंशाच्या वर पोहचले आहे. एकीकडे काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता असताना उकाड्यात मात्र वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये चंद्रपूरात कडक उन्हाळा जाणून लागला असून मे व जून अजून यायचा आहे. त्यामुळे येत्या काळात सूर्य आग ओकणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT