चंद्रपूर: पैलवानांनी केली ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफारी | पुढारी

चंद्रपूर: पैलवानांनी केली ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफारी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे तालुका क्रीडा संकुलात तीन दिवशीय राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. तालुका क्रिडा संकुलातील लाल मातीच्या मैदानावर तीन दिवशीय कुस्ती स्पर्धा झाल्या.

या कुस्ती स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून पैलवान सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंना व त्यांच्या पालकांना जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्पात सफारी करण्याची संधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धा पार पडल्यानंतर विनामूल्य उपलब्ध करून दिली.

१९१ खेळाडू व पालकांनी ताडोबा येथे व्याघ्र सफारीचा आनंद लुटला. या सफारी दरम्यान खेळाडू व पालकांनी टायगर फायटिंग सुद्धा अनुभवली. ताडोबातील रूबाबदार वाघांना त्यांना पाहता आले. व्याघ अभयारण्याच्या जिल्ह्यात येऊन कुस्तीपटू आणि पालकांना विनामूल्य ताडोबा सफारी करण्यात आल्याने कुस्तीपटू आणि पालकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

या संपूर्ण नियोजनात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी जबाबदारी सांभाळली. यासाठी विशेष करुन पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, स्वीय सहाय्यक संतोष अतकरे, वनाधिकारी काळे तसेच सोयाम यांनी खेळाडू व त्यांच्या पालकांच्या ताडोबा सफारीचे नियोजन केले.

हेही वाचा 

Back to top button