विदर्भ

heatstroke : उपराजधानीत उष्माघातामुळे ५ जणांचा मृत्यू

अविनाश सुतार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विविध ठिकाणी उष्माघाताने (heatstroke) पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यत ३५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

(heatstroke) प्रतापनगरमधील खामला बाजारात ५० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. सदरमधील गड्डीगोदाम येथील थ्री बदर्स दुकानासमोर ४० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. सदरमधील डीआरएम कार्यालयामागे ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. पाचपावलीतील वैशालीनगर परिसरात ४० वर्षीय अनोळखी युवक बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

पारडीतील अंबेनगर परिसरातही ६० वर्षीय अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला. सर्वांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे. पाचही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT