विदर्भ

अमरावती बाजार समितीच्या सभापतीपदी हरिष मोरे, उपसभापतीपदी भैय्यासाहेब निर्मळ बिनविरोध

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हरिष मोरे तर उपसभापतीपदी भैय्यासाहेब निर्मळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा केला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व १८ जागांवर महाविकास आघाडीने अभूतपूर्व विजय मिळविला होता. हा विजय जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा देणारा ठरला.

यावेळी मनोज देशमुख, सुनिल वऱ्हाडे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, मुकद्दर खाँ पठान, संजय नागोने, प्रविण मनोहर, अमित गावंडे, विरेंद्र जाधव, नरेंद्र मकेश्वर, ॲड. महेंद्र दिवान, निलेश मानकर, अशोक दहिकर, डॉ. रामदास रहाटे, प्रविण भुगूल, बाळासाहेब देशमुख, पंकज देशमुख, दिलीप सोनोने, शैलेश काळबांडे, शैलेश खोडस्कर, प्रभाकर धंदर, वहिद भाई, गजू ठाकूर, अंकुश जुनघरे, अमोल महात्मे, हरिराम लव्हाळे, विजयराव देशमुख, प्रमोद कळस्कर, सौरभ किरक्टे, प्रज्योत यावले, भैय्यासाहेब बुरघाटे, रेखा सरोदे, ज्योती ठाकरे, शिल्पा महल्ले, माया बुरघाटे, रिजवान भाई, नदिम भाई, डॉ. रमेश बोरा, नरेंद्र ठाकूर, जय रघुवंशी, तुषार देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT