विदर्भ

Gondia : १० लाखांच्या खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून

backup backup

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : दहा लाखाच्या खंडणीसाठी मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतात उघडकीस आली. आमगाव तालुक्याच्या बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. चेतन नरेश खोब्रागडे (वय १७) रा. बनगाव ता. आमगाव असे मृत मुलाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा मोठ्या आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी येथे निघाला. (Gondia)

परंतु रात्री घरी न परतल्याने घरतील लोकांनी त्याची शोधाशोध करुन विचारपूस केली. मुलगा घरी न परतल्यामुळे वडीलाने रात्री पोलीस ठाणे आमगाव येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली.रात्री चेतनचे अपहरण करण्यात आले. त्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी द्या अशी मागणी केली होती. खंडणीसाठी जो फोन आला तो फोन क्रमांक कुणाचा आहे तपासल्यावर तो फोन दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (२४) रा. नवेगाव खैरलांजी (मध्यप्रदेश) याच्या असल्याचे लक्षात आले. (Gondia)

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. बोदा येथील शेतात असलेल्या तणच्या ढिगाऱ्यात मृतदेह ठेवला होता. त्याची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर मिळाली. त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसच्या ढिगार्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआय मध्ये शिकत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत. (Gondia)

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT