Gondia : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हातोड्याने घाव घालून हत्या | पुढारी

Gondia : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हातोड्याने घाव घालून हत्या

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून युवकाने हातोड्याने घाव घालून तरुणीची हत्या केली. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील झिलमिली-चिरामणटोला रस्त्यावर (बुधवारी ता. २३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. धनश्री गोपाल हरिणखेडे (वय १८, रा. चिरामणटोला) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले (वय २३) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Gondia)

धनश्री हरिणखेडे ही सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिकवणी वर्गाकरिता सायकलने जात होती. यावेळी झिलमिली-चिरामणटोला रस्त्यावर दुर्गाप्रसाद रहांगडाले याने तिला अडविले. त्यानंतर क्षणात धनश्रीच्या डोक्यात हातोड्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आरोपीला अटक केली. (Gondia)

हेही वाचलतं का?

Back to top button