गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: देसाईगंज शहरातील आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारपासून (दि. ३) शाळेतून अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे.
कांचन वंजारी व रेशमा धोटे अशी बेपत्ता विद्यार्थिंनीची नावे आहेत. कांचन ही सातव्या, तर रेशमा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी सकाळी त्या शाळेत गेल्या होत्या. परंतु, शाळा सुटल्यानंतरही त्या घरी पोहोचल्या नाहीत. यासंदर्भात शाळा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात दोघीही दुपारी १ च्या सुमारास अल्प विश्रांतीच्या काळात बाहेर पडताना दिसून आल्या. कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली.
दोन्ही विद्यार्थिनी भगतसिंह वॉर्डातील रहिवासी असून त्या दोघी शेजारीच राहतात. त्या अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून देसाईगंज पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा