विदर्भ

यवतमाळ: सांडपाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने डायरिया व कॉलराची लागण; १३ रुग्णांची प्रकृती गंभीर

मोनिका क्षीरसागर

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: सांडपाणीमिश्रित पाणी पिण्यात आल्याने नेर तालुक्यातील बाणगाव येथे डायरिया व कॉलराची लागण झाली आहे. आत्तापर्यंत ६० जणांना उपचारार्थ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. गावात आरोग्य विभागाचे पथक पोहोचले असून लागण झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

गावातील मुंगसाजीनगर येथे ग्रामपंचायतीच्या बोअरवेलजवळ सांडपाण्याची नाली तुंबली आहे. हे घाण पाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने गावात कॉलरा व डायरियाची लागण झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. डायरियासोबत कॉलराचेही रुग्ण येथे आढळत आहे. अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत.

यामधील १३ जणांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने बोअरवेलच्या पाण्याचे नमूने तपासणीकरीता घेतले आहेत. गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले असून लागण झालेल्यांवर उपचार सुरू आहे. घरगुती बोअरवेल अस्वच्छ असल्याने डायरिया व कॉलराचा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT