आंतरराज्यीय गांजा तस्करांच्या चंद्रपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा राज्यातून अवैधरित्या गडचिरोली मार्गे चंद्रपूरात गांजाची तस्करी करतांना चंद्रपूर पोलिसांनी दोन गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंद्रपूर मूळ मार्गावरील चिचपल्ली गावाजवळील एका ढाब्याजवळ दोन वाहनातून 120 किलो गांजा तस्करी करताना जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज शनिवारी (26 मार्च 2022) ला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या कारवाईमुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गांजा तस्करी चा पर्दाफाश करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला आंतरराज्यांमधून दोन गांजा माफिया वाहनांनी गडचिरोली मार्गे चंद्रपुरात गांजा तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे व सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आल.
त्यांनतर गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर मुल मार्गावरील चिचपल्ली गावाजवळील शेरे ए पंजाब ढाब्याजवळ आज शनिवारी (26 मार्च 2022) पाळत ठेवली होती. तेलगंणा राज्यातून गडचिरोली मार्गे चंद्रपूरात गांजा घेऊन येणाऱ्या दोन संशयित वाहनांना अडवून वाहनचालकांची चौकशी केली असता गांजा तस्करी उघडकीस आली.
श्रीनिवास नरसय्या मचेडी (वय50), व्यवसाय शिक्षक व शंकर बलय्या घंटा (वय 29) व्यवसाय, रा. मस्जीद वार्ड, सुभाष नगर,मथनी, करीमनगर, तेलंगणा असे आरोपींचे नाव आहे. त्यांची अधिक झाडाझडती घेतली असता वाहनांमध्ये 51 पाकीटामध्ये भरलेला 120 किलो गांजा आढळून आले. गांजासह वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले दोन वाहने व गांजा जप्त करण्यात आला आहे.
रामनगर पोलिसांत गांजा तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.