भंडारा

Bhandara News : ऑर्डनन्स फॅक्टरीतील भीषण स्फोटात कामगाराचा मृत्यू

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डनन्स फॅक्टरी) आज (दि.२७) सकाळी नऊच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला. अविनाश मेश्राम असे मृत कामगाराचे नाव आहे. Bhandara News

मिळालेल्या माहितीनुसार, सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. अविनाश मेश्राम नेहमीप्रमाणे आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये पहाटे 6 वाजता कामाला आला होता. त्यानंतर अनपेक्षितपणे अडीच तासांतच ही घटना घडली. दरम्यान, हा स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये तारांबळ उडाली. स्फोटानंतर लागलेली आग फॅक्टरीचे अग्नीशमन दलाने तातडीने आटोक्यात आणली. Bhandara News

यापूर्वी देखील भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. त्यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT