भंडारा

Bhandara News : खैरलांजीजवळ दुचाकींच्या धडकेत परीक्षेला निघालेला विद्यार्थी ठार

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : बी.कॉम. पहिल्या वर्षाचे पेपर सुरू असल्याने प्रॅक्टिकल पेपर देण्याकरिता जात असलेल्या विद्यार्थ्याचा दोन दुचाकींच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.४) दुपारी १२ वाजता तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावाजवळ घडली. मनीष निलेश दहाट (वय १८, रा. गोंडीटोला) असे मृताचे नाव असून खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. Bhandara News

सविस्तर वृत्त असे की, आज मनीषची बी.कॉम. फर्स्ट इयरची प्रॅक्टिकल परीक्षा असल्यामुळे दुचाकीवरून गोंडीटोलावरून तुमसरकडे निघाला होता. पण खैरलांजी गावाजवळ आमोरासमोर दुचाकीची धडक झाल्याने त्यात मनीषला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मनीषला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मनीषला भंडाऱ्याला नेत असताना रस्त्यातच मनीषचा मृत्यू झाला. Bhandara News

दुसरा दुचाकी चालक गोलू लिल्हारे (वय१७, रा. आरंभा (मध्यप्रदेश) गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. मनीषच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. मनीषच्या घरी आई आणि अकराव्या वर्गात शिकत असलेली बहिण असून घरचा उदरनिर्वाह मनीष करीत होता. मनीषच्या जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुमसर- बपेरा मार्ग अतिशय खराब असल्याने या दोन्ही दुचाकींच्या खड्डे वाचविण्याच्या नादात आमोरासमोर धडक झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास तुमसर पोलिस करीत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT