भंडारा

Bhandara Rape: इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीचे लैंगिक शोषण: पीडिता सात महिन्यांची गर्भवती

अविनाश सुतार

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 23 वर्षीय तरुणाने एका २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. यामुळे ती सात महिन्यांची गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला साकोली पोलिसांनी अटक केली आहे. मनीष सुरेश सोनवाणे (वय २३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Bhandara Rape)

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित व आरोपीची इन्स्टाग्रामवर जानेवारी २०२२ मध्ये ओळख झाली. जून २०२२ मध्ये आरोपी हा पीडितेस सेंदूरवाफा येथे मामाच्या स्वागत समारंभात घेऊन गेला. तिथे उशीर झाल्याने रात्री अकराच्या सुमारास आरोपीने पीडितेस साकोली येथील लॉजवर नेले. तिथे लग्नाचे खोटे आमिष दाखविले. तसेच तिच्या तीन वर्षांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (Bhandara Rape)

त्यानंतर आरोपीने पीडितेचे अनेकदा लैंगिक शोषण केले. एकदा मारहाणही केली होती. तिचे वारंवार शोषण झाल्यामुळे ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपीविरोधात साकोली ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील उईके करीत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT