विदर्भ

भंडारा : कर्जाचे आमिष दाखवून १८ शेतकऱ्यांची ३२ लाखांची फसवणूक

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : सेंदूरवाफा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक मोरेश्वर बापूसा मेश्राम याने खासगी लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या नावावर कर्जाची परस्पर उचल केली. पोलीस तपासात १८ शेतकऱ्यांची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.

बँकेत कर्ज काढण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्यांच्या खात्यातून स्वत: व आपल्या सहकाऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून लाखो रुपयांचा गंडा घातला. सेंदूरवाफा शाखेत २०१२ ते २०१५ या कालावधीत झालेल्या या फसवणुकीच्या तपासादरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन बँक व्यवस्थापक मोरेश्वर बापुसा मेश्राम याच्यासह अन्य आरोपींनी ही फसवणूक केली आहे.

गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांची आणि १८ कर्जदारांची फसवणूक केल्याचे यामध्ये निष्पन्न झाले. शेतकऱ्यांना सुमारे ३२ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी साकोली पोलिसांना सात वर्षे लागली. भंडारासोबतच गोंदियातील शेतकऱ्यांनाही बँक व्यवस्थापकाने लक्ष्य केले. बँकेच्या हद्दीबाहेरील शेतकऱ्यांच्या शेतीचा सातबारा, कागदपत्रे कर्ज घेण्यासाठी वापरण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मदतीने शासकीय आदेश, कार्यालयाच्या परिपत्रकाची पायमल्ली करून फसवी कर्जे तयार केली.

कृषी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी असतानाही मोरेश्वर मेश्राम याने स्वत: सर्व कर्ज प्रकरणे मंजूर केली. मोरेश्वर मेश्राम आता निवृत्त झाला आहे. याप्रकरणी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण वायकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्कालीन बँक व्यवस्थापकासह राजू मन्साराम बनकर, गौतम महादेव चांदेवार, दुधेश्वर मनोहर सोनवणे यांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास सन २०१५ ते २०२२ पर्यंत सहा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी  केला आहे. याची सुरुवात तत्कालीन उपविभागीय अधिकारी मोहनदास संखे यांच्यापासून झाली. त्यानंतर श्रीकांत डिसले, विक्रम साळी, प्रभाकर टिक्कस, काटे यांनी तपास केला आहे. आता १९ जानेवारी २०२१ पासून उपविभागीय अधिकारी अरुण वायकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT