नागपूर : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या आशा बगे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्राप्त झाला आहे. या निमित्ताने त्यांचा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आशा बगे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या अनौपचारिक छोटेखानी कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि ९६व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील सन्मान चिन्ह चरखा प्रदान केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, कोषाध्यक्ष विलास लिमये, ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी, व्यवस्थापक प्रदीप मोहिते आदी उपस्थित होते.
हेही वाचा