नागपूर: ‘आर संदेश’ समूहावर ईडीचा छापा | पुढारी

नागपूर: 'आर संदेश' समूहावर ईडीचा छापा

नागपूरः पुढारी वृत्तसेवा: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागपुरातील रामदास पेठ परिसरात एका उद्योग समूहावर आज (दि.३) सकाळी छापा टाकला. आर. संदेश असे या ग्रुपचे नाव असून हा समूह रामदेव अग्रवाल व दिलीप अग्रवाल यांच्या मालकीचा आहे. अग्रवाल यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने एकाचवेळी हे छापे टाकले आहेत. ग्रुपच्या आक्षेपार्ह जमिन खरेदी प्रकरणी हे छापे टाकल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरुच होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी आज सकाळीच ईडीचे पथक पोहोचले. या ठिकाणी आर. संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांचे निवासस्थान आहे. अग्रवाल यांचे बांधकाम, कापड उद्योग, मीडिया आणि औषध क्षेत्रात मोठे नाव आणि काम आहे. नागपुरातील काही जमीन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button