विदर्भ

Amravati Crime : ब्लॅकमेल करत दोघांनी केले तरुणीवर अत्‍याचार

अविनाश सुतार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेल करत दोघांनी तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हर्षल चंद्रकांत बाभुळकर (वय २२, रा. रामनगर वर्धा) आणि आकाश सिंघाणे (वय २५, रा. अंजनवती) या संशयित आरोपींवर गुन्‍हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी फेब्रुवारी २०२२ मध्ये वर्धा येथे नातेवाईकाकडे गेली होती. येथील हर्षल बाभुळकर याच्‍याशी तिचे प्रेमसबंध जुळले. महिनाभरानंतर ती आपल्या गावी परतली. यानंतर हर्षल व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी अश्लील संभाषण आणि हातवारे करायचा. त्‍याच्‍या वागणुकीला कंटाळून पीडितेने ऑक्टोबर २०२२ मध्ये हर्षल बाभुळकर याच्‍याशी  बोलणे बंद केले. तसेच त्‍याचा मोबाईल फोन क्रमांक ब्लॅक केला. (Amravati Crime)

डिसेंबर २०२२ मध्ये पीडितेची आकाश सिंघाणे या तरुणाशी ओळख झाली. आकाशने २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तिला बस स्थानकावर बोलवून घेतले. लग्नाचे आमीष दाखवून तरोडा फाट्याच्या कॅनॉलच्या बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, हर्षल व आकाश एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही तिला ब्लॅकमेल करू लागले.

आकाशने पीडितेला धमकावून  दोनवेळा तिच्यावर बलात्कार केला. हर्षलनेही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. दरम्यान, हर्षलने तिचा व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

या प्रकरणी सुरवातीला तक्रार नोंदवून न घेता पीडित तरुणीला आरोपी व घटनेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील असल्याने तक्रार तिथेच करा, असा सल्ला तळेगाव पोलिसांनी दिला. त्यानंतर पीडित तरुणी नातेवाईकांना घेऊन २० जानेवारीला वर्धा येथील रामनगर पोलीस ठाण्यात गेली. मात्र, त्या ठिकाणी सुद्धा तिचा तक्रार अर्ज घेऊन अमरावतीतील प्रकरण असल्याने अमरावती तक्रार दाखल करण्यास सांगितले. अखेर २१ जानेवारी रोजी अमरावती पोलिसांनी तळेगाव दशासर पोलिसांना सांगून गुन्हा नोंद करून घेतला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT