अकोला

Akola By-Election: काँग्रेसकडून साजीदखान पठाण यांची पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर

अविनाश सुतार
अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून साजीदखान पठाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा निसटता विजय झाला होता. आमदार शर्मा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. Akola By-Election
अकोला लोकसभा निवडणुकीसोबतच आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघाची ही पोट निवडणूक होत असल्याने प्रशासनाने या अनुषंगाने पूर्व तयारी केली आहे. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीकडून निखिल गावंडे यांच्या नावाचा ठराव वंचितच्या पदाधिकारी यांनी पक्षाकडे यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे वंचित कडून कोणाची उमेदवारी दाखल होईल. याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. मात्र, भाजपने या विधानसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही. Akola By-Election
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT