अकोला, पुढारी वृत्तसेवा: अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी ६५ एमएलडी जलशुध्दी केंद्रावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि मी. व्यासाचा व्हॉल्व्ह जेल चौकातील अधिकारी निवासजवळ नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
अकोला शहरातील केशव नगर, आदर्श कॉलनी, नेहरू पार्क, तोष्णीवाल ले-आउट, रेल्वे स्टेशन परिसर, मराठी शाळा क्र. ७. अकोटफैल, गंगा नगर, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर आणि उमरी, मलकापूर व खडकी या जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा ३१ मे आणि १ जून २०२४ रोजी दोन दिवस बंद राहणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.