विदर्भ

यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून युवकाचे आंदोलन

अनुराधा कोरवी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी एका युवकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

श्याम गायकवाड असे या आंदोलन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर ७ या शाळेच्या जमिनीवर आणि काही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी, शिवाय आपल्यावरील आत्महत्येच्या प्रयत्नाचा जुना गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या युवकाने केली. मात्र, त्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या या युवकाने थेट आंदोलनाची भूमिका घेतली. आणि मंगळवारी (दि.१०) रोजी तो मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढला.

ही बाब काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस यंत्रणेसह निवासी उपजिल्हाधिकारी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्याची समजूत काढून त्याला टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला गेला. या आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र, चांगलीच भंबेरी उडाली होती.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT