आता प्रॉपर्टी कार्ड ‘महाभूमी’वर, अशी पाहा अर्जाची स्थिती | पुढारी

आता प्रॉपर्टी कार्ड ‘महाभूमी’वर, अशी पाहा अर्जाची स्थिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भूमिअभिलेख विभागाने ‘महाभूमी’ या संकेतस्थळावर प्रॉपर्टी कार्ड किंवा फेरफारची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. अर्थात, प्रायोगिक तत्वावर ही माहिती संकलित केली आहे. मात्र, पुढील महिन्यापासून ही माहिती पूर्णपणे देण्यास सुरुवात होणार आहे.

sedition law : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

सर्वसामान्य नागरिकांना जमीन अथवा मालमत्तेचे पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) व फेरफार हवे असल्यास संबंधिताना तालुका अथवा शहर भागात असेल्या नगरभूमापन (सिटी सर्व्हे कार्यालय) कार्यालयात समक्ष जाऊन अर्ज दाखल करावा लागतो. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड अथवा फेरफार पत्रक कधी आणि केव्हा मिळेल, याची माहिती हवी असल्यास त्यास वारंवार नगर भूमापन कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तरीही या कार्यालयातील लिपिक अथवा अधिकारी किंवा शिरस्तेदार माहिती देईलच असे नाही. मात्र कार्यालयातील या कर्मचार्‍यांना ‘मलिदा’ दिला की, लागलीच काम होते. असा अनेकांचा अनुभव आहे. याच बाबीला छेद देण्याचे काम भूमिअभिलेख विभागाने सुरू केले आहे.

Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस

या निर्णयानुसार संबंधित नागरिकांना मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) किंवा फेरफार हवा असल्यास त्याबाबत केवळ नगर भूमापन कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करावयाचा आहे. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अर्जावर आवक नंबर पडणार आहे. हा आवक नंबर पंधरा अंकी असणार आहे. नागरिकांना त्यांच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन दिसणार आहे. ही सुविधा भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

थरार! धाडसानं आई काठी घेऊन धावली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची केली सुटका

अशी पाहावी अर्जाची स्थिती

नगर भूमापन कार्यालयात प्रॉपर्टी कार्ड अथवा फेरफारबाबत नागरिकाने अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित नागरिकाच्या अर्जावर पंधरा आकडी आवक नंबर पडणार आहे. नागरिकांनी भूमिअभिलेखच्या ‘महाभूमी’ या संकेतस्थळावर जाऊन अप्लिकेशन स्टेटसवर गेल्यानंतर विंडो ओपन होईल. त्यानंतर आवक अर्जावरील पंधरा नंबरपैकी पहिल्या रकान्यामध्ये चार नंबर टाकल्यास जिल्हा, दुसर्‍या रकान्यामध्ये चार नंबर टाकल्यास तालुका, पुढील रकान्यात चार नंबर टाकल्यास कार्यालय अशी माहिती दिसेल. त्यानंतर अर्जाचा नंबर टाकून क्लिक केल्यास फेरफार आणि प्रॉपर्टी कार्डची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे.

Back to top button