डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील देवरास्मृती इमारतीच्या पार्किंग परिसरातील गटारीत तीन दिवसापासून गायब असणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह सापडला असून चेतन प्रदीप निकम (वय २९) असे मृत व्याक्तीचे नाव आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथे पाठविण्यात आला आहे.
डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरातील नवीन हनुमान मंदिरच्या शेजारी ही देवरामस्मृति इमारत असून सकाळी सातच्या सुमारास कार वॉश करण्यासाठी गेलेल्या वॉचमनला तेथे दुर्गंधी आल्याने त्यांने इमारतीतील रहिवाशांना बोलावले. यावेळी पार्किंगच्यामागे जाऊन पाहिले असता तेथे छोट्या गटारात तरूणाचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुर्ली येथील बांधकाम व्यावसायिक विनायक पाटील यांच्याकडे मयत चेतन हा चालक म्हणून काही वर्षे काम करीत होता. दरम्यान, तो बेपत्ता झाल्याची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी झाली होती. आज त्याचा मृतदेह गटारात आढळून आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ रामनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह मुंबई येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.
हे वाचलंत का?