SSC Exam at Hospital Pudhari
ठाणे

SSC Exam at Hospital: रुग्णालयात उपचार घेत विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा

प्रशासनाच्या तत्परतेमुळे ठाण्यात विशेष व्यवस्था; विद्यार्थ्याच्या जिद्दीचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अर्जुन चेमटे

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द आणि शिक्षणाची ओढ असेल तर त्यावर मात करता येते याचे प्रेरणादायी उदाहरण ठाण्यात पाहायला मिळाले. दहावीच्या परीक्षेदरम्यान प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्याला प्रशासनाच्या तत्परतेमुळे रुग्णालयातच परीक्षा देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर विद्यालयातील विद्यार्थी युग मिलन चितलिया हा दि. 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या एसएससी परीक्षेला बसला होता. परीक्षेदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने दहिसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरी सुद्धा उपचार घेत त्याने 3 मार्च 2026 पर्यंत परीक्षा दिली. मात्र 4 मार्च 2026 पासून त्रास वाढल्याने ठाणे येथील भानुशाली हॉस्पिल येथे त्याच्या फुप्फुसावर छोटीशी शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे त्याच्या व पालकांपुढे परीक्षा

चुकण्याची भीती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पालकांनी व शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीर दखल घेत विभागीय मंडळ वाशी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सचिव जोत्स्ना शिंदे-पवार व ठाणे शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांचे मार्गदर्शनाखाली -36 केंद्रांच्या परिरक्षक प्राजक्ता राऊत व उत्तम शिर्के यांनी विद्यार्थी, पालक यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संवेदनशीलता दाखत तातडीने विशेष परवानगी देत

हॉस्पिटलचे जवळील परीक्षा केंद्र 6031 मो.ह. विद्यालय ठाणेचे मुख्याध्यापक विकास पाटील, केंद्र प्रमुख पेंडसे मॅडम, परीक्षा प्रमुख पी.के. जाधव यांचे मार्फत सर्व गोपनियतेचे पालन करत रुग्णालयातच परीक्षा घेण्याची व्यवस्था केली. सर्व नियमानुसार पर्यवेक्षक, पोलीसांचे उपस्थितीत विद्यार्थाने रुग्णालयातच आपली परीक्षा दिली. त्यामुळे युगचे वडील मिनल चितलिया यांनी विभागीय मंडळ वाशी, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा कर्मचारी यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT