LPG Cylinder Shortage: कळव्यात गॅस सिलेंडर तुटवडा; पुरवठादार कार्यालयात ग्राहकांची गर्दी

आखाती युद्धाचा परिणाम; मागणी 2 हजार, पुरवठा फक्त 900 सिलेंडर
LPG supplier change
LPG supplierPudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे : आखाती युद्धाचा परिणाम पेट्रोल,डिझेल तसेच घरगुती गॅस सिलेंडरवरही जाणवू लागला आहे. याची सर्वाधिक झळ ठाणे महापालिका क्षेत्रात येत असलेल्या कळवा परिसरात जाणवू लागली असून कळव्यात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. बुक करूनही सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने ग्राहकांनी गॅस पुरवठादाराच्या कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे. जेवढी मागणी आहे तेवढ्या प्रमाणात पुरवठा करता येत नसल्याची कबुली देखील गॅस पुरवठादारांच्या वतीने देण्यात आली आहे.

LPG supplier change
Siddharth Chandekar Fraud Call: स्वर्गात आकाशगंगा... म्हणत सिद्धार्थ चांदेकरनं फ्रॉड कॉलरची चांगलीच फिरकी घेतली Video व्हायरल

आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतामध्ये देखील जाणवू लागला असून गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महानगरांमध्ये 25 टक्के हॉटेल्स बंद ठेवावी लागली आहे. दुसरीकडे याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना देखील बसू लागला असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कळवा परिसरात सुमारे 45 हजार घरांमध्ये एचपी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

LPG supplier change
Maharashtra CET: सीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळल्यास थेट बंदी

कळवा परिसरात दररोज सुमारे दीड हजार ते दोन हजार एचपी गॅस सिलेंडरची मागणी असते. मात्र सध्या केवळ सुमारे 900 सिलेंडरच उपलब्ध होत असल्याने उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करत असून काही ठिकाणी संतप्त ग्राहकांकडून पुरवठादारांना जाब देखील विचारला जात आहे. परिणामी पुरवठादार आणि ग्राहकांमध्ये वाद देखील होत असल्याचे समोर आले आहे. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने सिलेंडर उपलब्धतेत घट झाली आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

दरम्यान, आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाणे महानगरपालिका हद्दीत गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गॅस सिलेंडर जपून वापरण्याचे आवाहन पुरवठादारांच्या मार्फत करण्यात येत आहे.

LPG supplier change
Maharashtra Professor Recruitment: राज्यात प्राध्यापकांची मेगाभरती; जूनपर्यंत साडेपाच हजार पदे भरणार

मोबाईलवरील ओटीपी बघूनच सिलिंडर दिला जाणार: गॅस सिलेंडरची घरी डिलिव्हरी करताना यापुढे ग्राहकांच्या मोबाईलवरील ओटीपी बघूनच सिलेंडर दिला जाणार आहे. बुकिंग केल्यानंतर हा ओटीपी ग्राहकांना मिळणार आहे. गॅसचा तुटवडा पाहता कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होऊ नये यासाठी ही उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती गॅस पुरवठादारांच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंब्रा भागात तुटवडा: कळव्या प्रमाणे मुंब्याच्या काही भागातही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यास गर्दी केली आहे. बुकिंग करूनही सिलेंडर वेळेत येत नसल्याने मुंब्यातील नागरिक देखील हवालदिल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news