ठाणे

ठाणे : लाच घेतल्या प्रकरणी तलाठीसह साथीदारावर गुन्हा दाखल

backup backup

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे कांबा गावातील दुकानाचे नुकसान झाल्याने राज्य सरकार कडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. ही नुकसान भरपाई दिल्यानंतर कल्याणचे तलाठी यांनी एका त्रयस्त व्यक्ती मार्फत पंधरा हजार रुपये मोबदला द्या, अशी मागणी पुरग्रस्तांकडे केली. दरम्यान बुधवारी दुपारी संबधीत त्रयस्त व्यक्तीला या पूरग्रस्तांकडून पैसे घेत असताना लाचलुचपत खात्यांनी रंगेहात पकडले. यासंदर्भात संबधीत व्यक्ती आणि तलाठी अमृता बडगुजर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणचे तलाठी यांनी कांबा गावातील दुकानदारांची पावसाळ्यात झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम पूरग्रस्तांना दिली. मात्र तलाठी यांनी त्यांच्या त्रयस्त व्यक्तीमार्फत या पूरग्रस्तांकडून रक्कम दिल्याचा मोबदला मागितला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने या तलाठी कार्यालयात सापळा रचून कारवाई केली. तलाठी समवेत काम करत असलेल्या संबधीत व्यक्तीलाही अटक करण्यात आले आहे. अनंता भास्कर कंटे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कांबा गावात पावसाळ्यात काही दुकानांचे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई भरून देण्यासाठी राज्य सरकारने पैसे पाठवले होते. पूर ग्रस्तांच्या हक्काचे पैसे दिल्यानंतर तलाठी अमृता बडगुजर यांनी त्रयस्त व्यक्तीकडून 15 हजार रुपये मोबदला द्या अशी मागणी केली. त्यानंतर या पूरग्रस्तांनी याची माहिती लाच-लुचपत खात्याला दिली. त्यानुसार बुधवारी दुपारी लाच लुचपत खात्याने संबधीत कारवाई केली.

यावेळी तलाठीचा सोबत काम करणारा व्यक्ती कंटे हा पैसे घेण्यासाठी आला असता त्याच्यावर करवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांनी ही कारवाई केली. कंटे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर तलाठी अमृता बडगुजरच्या सांगण्यावरून लाच घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT