Drama Venue Maintenance
ठाणे : कधी निवडणूक प्रशिक्षण, कधी राजकीय सभा, व्हीआयपी गेस्टला कार्यक्रमांसाठी दिलेले नाट्यगृह तर कधी महिनोमहिने दुरूस्तीसाठी नाट्यगृह बंद, अशी नाट्यगृह बंद पडण्याची कारणे आता महामुंबईतील नाट्यनिर्मात्यांना वारंवार ऐकावी लागत आहे. महामुंबईत असलेल्या चौदा नाट्यगृहांपैकी रसिकांची गर्दी खेचणारे गडकरी रंगायतन आणि बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहही दुरूस्तीसाठी बंद आहेत, त्यात आता डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची भर पडली आहे.
नाट्यगृहाच्या छताचा छोटासा तुकडा को-सळला, त्यावेळी (शुक्रवारी) नाट्यप्रयोग किंवा कोणताही कार्यक्रम नसल्याने दुर्घटना टळली आहे. पण ऐन हंगामात महत्वाची अस लेली उपनगरांमधील तीन नाट्यगृहे बंद पडल्याने निर्मात्यांचे आर्थिक नुकसान आणि रसिकांचा हिरमोड होणार आहे. मात्र नाट्यगृह काही वर्षे तरी सुस्थितीत राहील आणि तिथे प्रेक्षकांना कलेचा आनंद लुटता येईल, अशी नाट्यगृहांची दुरूस्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाट्यगृहांची दुरावस्था हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, वाशी या भागात नाट्यप्रयोगांना आजही रसिक गर्दी करतात, नाट्यगृहातील दुरावस्थांकडे दुर्लक्ष करत नाटकांच्या प्रेमापोटी शो मस्ट गो ऑन भावनेनं कलाकार आणि निमति नाटकांचे प्रयोग वर्षानुवर्षे करत आहे. कधीतरी एखादा कलाकार समाज माध्यमांवर नाट्यगृहाविषयी आवाज उठवतो, मात्र महापालिका सारख्या यंत्रणा वरवरची डागडुजी करतात, त्यामुळेच नाट्यगृहांमध्ये छताचे भाग कोसळेपर्यंत यंत्रणा थंडपणे बघत बसतात, हे नाट्यगृहांचे वास्तव आहे.