डोंबिवली : डोंबिवलीतील देसले पाडा या ठिकाणी एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला देहविक्रीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आला व तिची विक्रीही करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी पोलीस तक्रार करूनही पोलीस तपास धिम्या गतीने सुरु होता. शेवटी सामाजिक कार्यकर्ते आणि पीडित मुलीच्या मामे भावाने शोध लावला. व देहविक्री करणारी महिला तिच्या पती आणि दोन ग्राहकांना पकडून दिले. आता देहविक्रीचा व्यवसाय करणारी महिला, तिचा पती आणि दोन ग्राहक यांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी आशुतोष राजपूत अध्याप फरार आहे.
डोंबिवलीत एक विधवा महिला आपल्या मुलीसोबत खानावळ चालवीत होती. तिथे मसाले देणारा आशुतोष राजपूत याची त्या मुलीसोबत ओळख झाली. १५ वर्षाच्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा आशुतोष राजपूत या नराधमाने तिला फिरवले. मोठमोठी स्वप्न दाखवली. व तिला तिथून घेऊन निघून गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेक वेळा जबरदस्ती करून अत्याचार केले. ती गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपात करण्यासाठी भाग पाडले. एवढे होऊनही तो नराधम थांबला नाही तर त्याने तिला देसले पाड्यात मुस्कान शेख नावाच्या देहविक्री करणाऱ्या एका महिलेला साडेसात लाखाला विकले. पैसे घेऊन आशुतोष डोंबिवली येथून फरार झाला असून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या आईने मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारे मुलीचा शोध घेतला नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि तिच्या मामे भावाने पीडित मुलीचा शोध घेत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत मुस्कान शेख, तिचा पती व दोन ग्राहकांना अटक पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशुतोष राजपूत अजूनही फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेने डोंबिवली शहर हादरले आहे.