

श्रीरामपूर: बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीबरोबर स्नॅपचॅटवर ओळख करून, तिला श्रीरामपूर येथे भेटला. शिर्डी येथे नेवून तिच्या इच्छेविरुद्ध त्याने शारीरिक संबंध ठेवून, अश्लील फोटो दाखवित, ‘तुझी बदनामी करील,’ अशी धमकी देत, वारंवार लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गजानन मनोहर देशमुख या तरुणाने स्नॅपचॅटवर वैजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी ओळख केली. श्रीरामपूर येथील एका कॉलेजच्या गेटवर भेटून, त्याने तिला शिर्डी येथे बळजबरीने नेले. तेथे त्याने तिच्याकडे रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरला.
‘तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत, ते तुझ्या आई, वडिलासह भावाला पाठवून तुझी बदनामी करील,’ अशी धमकी देऊन, तिच्या इच्छेविरुद्ध त्याने अत्याचार केला. यानंतर वारंवार धमकी देवून, त्याच लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पिडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील गजानन मनोहर देशमुख या तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम 4,8,12 अन्वय्ये गुन्हा दाखल केला आहे.