Russian Dream Teacher assaults student |
सेंट पीटर्सबर्ग : 'ड्रीम टीचर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियातील एका शिक्षिकेला तिच्या शाळेतील ११ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 'द न्यू यॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, २७ वर्षीय अण्णा प्लाक्स्युकने पीडित विद्यार्थ्याला तिच्या गुप्तांगांना स्पर्श करायला लावले आणि ओठांवर चुंबन घेण्यास भाग पाडले होते.
शिक्षिकेने अश्लील फोटो विद्यार्थ्याला पाठवले अन्...
रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या उत्तरेकडील टोकसोवो येथील एका शाळेतील ही घटना आहे. लेनिनग्राड प्रदेशातील एका न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. २७ वर्षीय शिक्षिका अण्णा प्लाक्स्युकने शाळा सुटल्यानंतर एका विद्यार्थ्याला वर्गात थांबवून त्याच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्यानंतर घरी गेल्यावर तिने तिचे अश्लील फोटो विद्यार्थ्याला पाठवले आणि बदल्यात त्याचेही तसेच फोटो मागितले. पीडित मुलाच्या आईने जेव्हा शिक्षिका आणि तिच्या मुलाचे व्हॉट्सअॅपवरील अश्लील संदेश आणि फोटो पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. त्यानंतर तिने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली.
"विद्यार्थ्याने कौतुक केल्याने आकर्षित झाले"
शिक्षिका अण्णा प्लाक्स्युक हिने तिच्यावरील सर्व आरोप मान्य केले. तिने असाही दावा केला की, "पीडित मुलाने पहिल्यांदा तिचे कौतुक केले होते, ज्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली."
'ड्रीम टीचर' ला शिक्षा
या घटनेने त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना धक्का बसला आहे, कारण प्लाक्स्युक हिला याआधी सर्वजण 'ड्रीम टीचर' म्हणून ओळखत होते. १४ वर्षांखालील मुलावर लैंगिक हिंसाचार केल्याबद्दल अण्णा प्लाक्स्युक हिला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा खटला नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झाला आणि सुमारे ४ महिने चालला. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्लाक्स्युक हिला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तिला एक वर्षासाठी शिकवण्यास बंदी घालण्यात आली आहे.