Las Kalyanachi Vaccination Awareness : बालकांच्या आरोग्यासाठी ‘लस कल्याणाची’ मोहीम; सापाडमध्ये लसीकरण जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद Pudhari
ठाणे

Las Kalyanachi Vaccination Awareness : बालकांच्या आरोग्यासाठी ‘लस कल्याणाची’ मोहीम; सापाडमध्ये लसीकरण जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

झेड.एम.क्यू. एनजीओ व पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवाडी येथे समुदायाधारित लसीकरण जनजागृती उपक्रमाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

लहान बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित व वेळेवर लसीकरण अत्यंत आवश्यक असून, समाजाचा सक्रिय सहभाग हाच यशस्वी लसीकरण होण्याचा कणा आहे. या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या “लस कल्याणाची” या समुदायाधारित लसीकरण जनजागृती उपक्रमांतर्गत झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी रोजी आनंदवाडी येथील बुद्ध विहारात लसीकरण जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणाबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करून, लसीकरणाची भीती आणि अफवा तज्ज्ञांच्या उपस्थितीत दूर करण्यात आले. लसीकरणाविषयी माता-भगिनींसह पालकांमध्ये विश्वास निर्माण करून प्रत्येक बालकाचे नियमित आणि वेळेवर लसीकरण करण्यासाठी लस कल्याणची उपक्रमाचे माध्यमातून शहरातील वस्ती-वस्तीत काम करण्यात येत आहे. या चर्चासत्रांमध्ये 55 महिला भगिनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

“लस कल्याणाची” हा उपक्रम फक्त माहिती देण्यापुरता मर्यादित नसून, समुदायातील विश्वासार्ह व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणाचा संदेश घराघरात पोहोचवण्यावर देणारा आहे. कार्यक्रमाची सुरुवात फील्ड कोऑर्डिनेटर शोभा यांनी स्वागतपर भाषणाने देत ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमाची उद्दिष्टे उपस्थितांसमोर मांडली. लसीकरणाविषयी कामकाज आणि लसीकरणाचे महत्त्व याविषयी माहिती देत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम नोंदवले. तर प्रकल्प समन्वयक रहीम खान यांनी उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेत, केडीएमसी आरोग्य यंत्रणा, आणि घजङी स्थानिक समुदायाच्या सहकार्यामुळे उपक्रम प्रभावीपणे पुढे जात असल्याचे सांगितले. जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना क्यू आर कोड स्कॅन करून व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासही आग्रह धरला. या कार्यक्रमात की ओपिनियन लीडर्स ( घजङी) संगीता, लक्ष्मी, रुपाली आणि रेखा यांनी सक्रिय सहभाग घेतला.

संगीता यांनी ‌‘लस कल्याणाची‌’ गटात काम करताना मिळालेला अनुभव सांगितला. त्या डिसेंबर महिन्याच्या चॅम्पियन ठरल्याबद्दल त्यांना नचट ऊर्शींशश्रेािशपीं कडून सन्मानपत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा व्हिडिओ पुढारी न्यूजवर झळकल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. रूपाली यांनी व्हॉट्सॲप गटातून मिळणारी माहिती परिसरातील कुटुंबांपर्यंत, विशेषतः लहान मुलांच्या मातांपर्यंत पोहोचवत असल्याचे सांगितले. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, चूींह र्ीीं ठशरश्रळूीं प्रश्नोत्तरे आणि क्विझ अशा परस्परसंवादी उपक्रमांचे आयोजन जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. लसीकरणानंतर ताप येणे, लसीमुळे आजार होतो का, एकाच वेळी अनेक लसी देणे सुरक्षित आहे का,

अशा सामान्य शंकांवर चर्चा झाली. घजङीनि सोप्या भाषेत योग्य माहिती देत नागरिकांचे गैरसमज दूर केले. या कार्यक्रमाला कोळसेवाडी णझकउ आणि घऊचउ व आरोग्य पथकाची उपस्थिती लाभली. वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिकार, ढइकत हर्षद, ॠछच सिस्टर सविता व स्थानिक आशा सेविका उपस्थित होत्या. डॉ. काशिकार यांनी नियमित लसीकरणाचे महत्त्व पटवून देताना नव्याने सुरू झालेल्या कझत लसीबद्दल माहिती दिली. त्यांनी नचट ऊर्शींशश्रेािशपींच्या डिजिटल आरोग्य जनजागृतीतील भूमिकेचे कौतुक करत सर्वांना व्हॉट्सॲप चॅनेलशी जोडण्याचे आवाहन केले. सिस्टर सविता यांनी वयोगटानुसार दिल्या जाणाऱ्या लसींची माहिती देत वेळेवर लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. आशा सेविका नियमितपणे कुटुंबांना आरोग्य सेवांसाठी मदत करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT