Dombivli Accident | डोंबिवलीत डंपरखाली चिरडून दुचाकीस्वार महिला ठार

विष्णूनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Woman Killed by Dumper Dombivli
नम्रता नारायण साळवीPudhari
Published on
Updated on

Woman Killed by Dumper Dombivli

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून काँकीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामासाठी असलेल्या ठेकेदाराच्या एका डंपरखाली (हायवा) चिरडून नम्रता नारायण साळवी (वय ६५) नामक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास गोपीनाथ चौकात घडली. ही महिला दुचाकीवरून प्रवास करत होती. अपघातग्रस्त डंपर मुदतबाह्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात सदर डम्परच्या चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे एमएमआरडीएकडे असलेल्या ठेकेदाराच्या मलबावाहू डंपरची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अत्यावश्यक प्रमाणपत्रे घेण्याची मुदत तीन/चार वर्षापूर्वी संपली आहे. तरीही असे डम्पर रस्त्यावर चालविले जात असून अपघातानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आला आहे.

Woman Killed by Dumper Dombivli
Dombivli News |डोंबिवलीतील धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा!

अपघात घडताच मारहाणीच्या भितीने चालक त्याच्या ताब्यातील डम्पर तेथेच सोडून पळून गेला. पश्चिम डोंबिवलीत एमएमआरडीएच्या निधीतून सीमेट काँक्रीटचे रस्ते आणि गटारांची बांधकामे सुरू आहेत. या कामासाठी ट्रक आणि डम्पर माल वाहतुकीसाठी वापरले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एमएमआरडीएच्या ठेकेदाराने महाराष्ट्रनगर भागातील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. खोदाई करून काढलेली डांबर, खडी आणि माती गोपीनाथ चौक भागातील जगदंबा माता मंदिर परिसरात डंपरने (हायवा) आणून टाकली जाते.

ही कामे गुरूवारी सकाळपासून सुरू होती. एम एच ०५/डी के/८४०७ क्रमांकाच्या डम्परचा चालक मलबा खाली करून जगदांबा माता मंदिराकडून गोपीनाथ चौकाकडे निघाला होता. याच वेळी नम्रता साळवी ही महिला आपल्या नातेवाईक मुलाच्या दुचाकीवरून गोपीनाथ चौकाकडे जात होती. गोपीनाथ चौकात वळण घेत असताना डम्पर दुचाकीच्या दिशेने आल्याने त्याची दुचाकीला ठोकर बसली. पाठीमागे बसलेली नम्रता साळवी ही महिला दुचाकीवरून पडून डम्परच्या मागच्या चाकाखाली आली. अपघातात गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या नम्रता यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेले, तथापी येथील डॉक्टर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Woman Killed by Dumper Dombivli
Dombivli News | मराठी माणूस कधी रडत नाही... अडचण आली तर मनसेचे पदाधिकारी आहेत : डोंबिवलीत मराठी विरुद्ध परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

विनापरवान्याची वाहने रस्त्यावर

अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर डम्परची नोंदणी डिसेंबर २०१९ मध्ये कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. मात्र या डम्परचा विमा २९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपलेला आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र १२ डिसेंबर २०२२ रोजी संपलेले आहे. तर अत्यावश्यक असलेले सक्षमता प्रमाणपत्र १३ डिसेंबर २०२३ रोजी संपलेले असल्याचे उघड झाले आहे.

ठेकेदारावरही कठोर कारवाईची मागणी

मोटार वाहन कायद्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून हे डम्पर एमएमआरडीएच्या ठेकेदारामार्फत रस्ते कामासाठी वापरले जात असल्याची धक्कादायक बाब आरटीओच्या कागदपत्रांतून समोर आली आहे. त्यामुळे निष्काळजीपणा, ठेकेदारांची मनमानी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी डम्पर चालकासह संबंधित ठेकेदारावरही कठोर कारवाईची मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Woman Killed by Dumper Dombivli
Kalyan Dombivli Corporators: कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल

आरटीओकडून कारवाईला वेग

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी नियमबाह्यपणे चालविण्यात येणाऱ्या या डम्परच्या मालकाविरूध्द मोटार वाहन कायद्याने कारवाई सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात दररोज अनेक डम्पर, हायवा आणि जड/अवजड मिक्सर धावत असतात. याशिवाय वस्तूंची घरपोच सेवा देणाऱ्या दुचाक्या देखील धावतात. या सर्व वाहनांची वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि आरटीओने संयुक्त तपासणी करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यामधील सर्वाधिक वाहने परवाना संपलेली, भंगारातील अर्थात कालबाह्य झालेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news