आ. रविंद्र चव्हाण  
ठाणे

मी पक्षाचा कार्यकर्ताच आहे, जबाबदारीने मोठा झालो : आ. रविंद्र चव्हाण

स्वालिया न. शिकलगार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस यांनी  त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शवर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणं आवश्यक आहे. ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे प्रतिपादन आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथे केले. .

शिवसेना भाजपा सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात सुरत ते गुवाहाटी अशी ऑपरेशन कमळ राबविणारे मिशन कंट्रोलर ही कामगिरी बजविल्यानंतर रविंद्र चव्हाण आज डोंबिवलीत परतले. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्यावतीने आज शहरातील भाजपच्या सावरकर उद्यानातील कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती तन मन धनाने पूर्ण करणे हेच एक कार्यकर्ता म्हणून ध्येय ठेवले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतील एक छोटी जबाबदरी मला दिली आणि त्या जबाबदारीने मला मोठं केलं असं फार तर मी म्हणेन, असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले.

संयम हीच भाजप कार्यकर्त्याची खरी ताकद असून सत्तेमुळे जबाबदारीचे भान ठेवा, असा सल्ला चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. नरेंद्र मोदीजींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आह. त्यामुळे समर्पण भावनेने पक्षाची आणि जनतेची कामे करत रहा, असा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT