महाराष्ट्र

तंत्रशिक्षण हिवाळी परीक्षा ऑनलाइनच

अमृता चौगुले
  • डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  • जानेवारीपासून सुरू होणार प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारित येणार्‍या इंजिनिअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा; तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची हिवाळी प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे.

'तंत्रशिक्षण'च्या 3 ते 15 जानेवारीदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा आणि 18 जानेवारी ते 9 फेब—ुवारीदरम्यान लेखी परीक्षा होणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी जाहीर केले आहे. इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. वेळापत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार, हिवाळी परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने घ्यायच्या आहेत. परीक्षा विद्यार्थ्यांना वास्तव्यास असणार्‍या ठिकाणावरूनच देता येणार आहे. परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात येईल. परीक्षेत विद्यार्थ्यांना 40 पैकी 35 प्रश्न सोडवावे लागतील.

ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही, त्यांना जवळच्या 'पॉलिटेक्निक'मध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी. यासाठी विविध मीटिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. अशा प्रकारे शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्यात यावी. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

नॉन एआयसीटीई अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार उशिरा

राबविणार्‍या संस्थांची संलग्नतेची प्रक्रिया, विद्यार्थी प्रवेश, नोंदणी प्रक्रिया आणि हिवाळी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित प्रक्रिया अद्याप पूर्णच झाली नसल्यामुळे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. संबंधित परीक्षांचा कालावधी निश्चित करून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे 'एमएसबीटीई'व्दारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे नॉन एआयसीटीई अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक

(पहिले आणि तिसरे सत्र वगळून नियमित विद्यार्थी)
प्रात्यक्षिक परीक्षा
3 ते 12 जानेवारी 2022
ऑनलाइन लेखी परीक्षा
18 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2022
पहिले आणि तिसरे सत्र
(नवीन प्रवेशित विद्यार्थी)
प्रात्यक्षिक परीक्षा
10 ते 15 जानेवारी 2022
ऑनलाइन लेखी परीक्षा
18 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2022

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT