सोलापूर पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 14 वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांचे हस्ते होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक यांनी सांगितले आहे.
9 मार्च 2022 रोजी विठ्ठल सभागृह पंढरपूर येथे संमेलन होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरित केला आहे. यासह इतर दहा ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे.
https://twitter.com/i/status/1500764361413230597
रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटांचे लेखन दिग्दर्शक त्यांनी केले आहे, तसेच संगीतही दिले आहे. आजवर त्यांची महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासावर हजारो व्याख्याने झाली आहेत.
उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन व संमेलनाचा समारोप असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.
हेही वाचा