सातारा : पुढारी वृत्तसेवा :
'तुमचे खाते ब्लॉक होणार आहे. ते ब्लॉक व्हायचे नसेल तर पाठवलेली लिंक ओपन करा,' असा मेसेज करुन बँकेतील खात्यावरील 28 हजार 700 रुपयांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली. लिंक पाठवून त्यावर पॅन कार्ड नंबर, ओटीपी टाकायला सांगून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी प्रमोद बर्गे (रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, कोणीही लिंक पाठवल्यास किंवा फोन करुन बँक खात्यासंबंधी अशी कोणतीही माहिती विचारल्यास त्याला प्रतिसाद देवू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :