सातारा

Omkar Pawar : सनपाने येथे आयएएस ओंकार पवार यांची जंगी मिरवणूक

अविनाश सुतार

मेढा : पुढारी वृत्तसेवा : दुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यातील सनपाने हे छोटेसे गाव. मात्र, या गावच्या लेकाने ( Omkar Pawar) आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकवला असून सनपानेचे नाव सर्वत्र चर्चेत आले आहे. आयएएस पदी निवड झालेल्‍य ओंकार पवार या आपल्या लाडक्या लेकाची सनपानेवासियांनी रथातून भव्य मिरवणूक काढली. या साेहळ्यासाठी  अवघा गाव एकवटला होता. सार्‍यांनीच ओंकारचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सनपाने येथील ओंकार पवार  (Omkar Pawar) यांनी युपीएससी परीक्षत यश संपादन केले. या यशाने अवघा गाव अभिमानाने फुलून गेला. सर्वत्र ओंकार यांच्या कौतुकाचीच चर्चा झाली. एवढे करुन गावकरी थांबले नाहीत. या लाडक्या लेकासाठी जंगी मिरवणुकीचे आयोजन केले. सर्वांनी एकत्र येवून धमाकेदार मिरवणूकही काढली. गावच्या वेशीवरून फटाक्यांची आतीषबाजी करीत ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार केला. दै. 'पुढारी'चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी ओंकार यांचे स्वागत केले. त्यानंतर जंगी मिरवणुकीला प्रारंभ झाला.

ओंकार यांनी गावाची मान उंचवल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मिरवणुकीत ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. गावकर्‍यांबरोबरच पंचक्रोशीतून आलेल्या ग्रामस्थांनीही मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी ओंकार यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. ओंकार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. मिरवणुकीच्या वेळी महिलांनी आपल्या दारांपुढे सुंदर अशा रांगोळ्या देखील काढल्या होत्या. अवघे गाव ओकारच्या यशाने, जयघोषाने भारावून गेले होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT