वारकर्‍यांची गैरसोय झाल्यास कडक कारवाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख यांचा इशारा

वारकर्‍यांची गैरसोय झाल्यास कडक कारवाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख यांचा इशारा

उंडवडी, पुढारी वृत्तसेवा: पालखी काळात शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा व कामचुकारपणा होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी. चुकीचा प्रकार आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिला.

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे दि. 27 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी येथील पालखी तळाला भेट देऊन तळ व परिसराची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, मंडल अधिकारी लक्ष्मीकांत मुळे, तलाठी सचिन मारकड, ग्रामसेवक विनोद आटोळे, प्रदीप बनसोडे, सरपंच शोभा कांबळे, पोलिस पाटील सविता गवळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोनामुळे दोन वर्षे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व वारकरी मुक्कामी आले नव्हते. यंदा गावकरी आणि प्रशासनाला पालखी सोहळा आणि वारकर्‍यांची ओढ लागली आहे. त्यामुळे यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालखी सोहळा दि. 27 जूनला उंडवडी सुपे येथे मुक्कामी येत आहे. या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, प्रशासनाच्या वतीने सर्व जय्यत तयारी सर्वोत्कृष्ट व्हावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी येथील पालखी तळाला भेट देऊन पाहणी केली व वारकर्‍यांच्या सुखसोयीबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.

https://youtu.be/IYYU1mogoqk

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news