सातारा

निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर १४ झाडं लावा : रामराजे नाईक निंबाळकर

अनुराधा कोरवी

सातारा; पुढारी वृत्तसेवा: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फलटणमध्ये १००० झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले. या कार्यक्रमात विनविभाग सातारा, मुधोजी महाविद्यालय फलटण तसेच आम्ही निसर्गसोबती या संस्थांनी सहभाग घेतला होता.

लावलेली झाडे जगवण्यासाठी कायम प्रयत्न करण्याचा निश्चय करुन फलटण तालुक्यातील जावली गावात १५ लाख झाडं लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला. या वेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी पर्यावरण आणि झाडांच महत्त्‍व सांगितलं. प्रत्येक व्यक्तीने १४ झाडं लावली पाहिजेत, असा संदेश देत निवडणुकीचं तिकीट पाहिजे  १४ झाडं लावुन दाखवाच, असा आदेशच काढला पाहिजे, असा सल्ला देखील त्‍यांनी या वेळी दिला.

चित्रपट अभिनेत्यांनी या चळवळीत आलं पाहिजे, त्यांच्या येण्यामुळे तरुण यात सहभागी होतील आणि झाडं लावण्याची चळवळ निर्माण होईल, तसेच भोंगे लावायचं का नाही? हा वाद करण्यापेक्षा झाडं लावलेली परवडली, असेही ते म्‍हणाले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, उपवनसंरक्षक महादेव मोहीते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT