सातारा

सातारा : गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी; कृत्रिम तळ्याची निर्मिती

निलेश पोतदार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर व हद्दवाढ परिसरातील गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या मूर्तीसाठी बुधवार नाक्यावर ३५ फूट खोल कृत्रिम तळे उभारण्यात आले असून, त्यामध्ये सुमारे ३ कोटी २० लाख लिटर पाणी साठवण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी १०० मेट्रिक टनी महाकाय क्रेनही दाखल होणार असून या तयारीची पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने गणेशोत्सव

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. शनिवार व रविवारी विसर्जन होणार असल्याने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.

बुधवारी नाक्यावर पूर्वीच खोदलेल्या कृत्रिम तळ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. सुमारे ४८ बाय ६० मीटर व्यासाचे ३५ फूट खोल असलेल्या या कृत्रिम तळ्यावर प्लास्टिक कागद अंथरून त्यामध्ये सुमारे ३ कोटी २० लाख लिटर पाण्याचा साठा करण्यात आला आहे.

त्यासाठी १० एचपीच्या २ विद्युत मोटारी रात्रंदिवस सुरु आहेत. गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्वागतमंच उभारण्यात आला आहे.

मोठ्या गणपती मूर्तीच्या विसर्जनासाठी १०० मेट्रिक टनी क्रेन दाखल होणार आहे. मूर्ती लोखंडी पाटावर ठेवून क्रेनच्या साहाय्याने गणपती विसर्जन केले जाणार आहे.

विसर्जनावेळी मदतीसाठी १० लाईफगार्डची व्यवस्था

विसर्जनावेळी मदतीसाठी १० लाईफगार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी स्टेज उभारण्यात आले असून तराफाच्या सहाय्याने मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

विसर्जनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॅरागेटिंग करण्यात आले असून, ठिकठिकाणी विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था करुन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

बांधकाम विभागाकडून विसर्जन

मार्गावरील खड्डे भरुन घेण्यात आले आहेत. गणेश विसर्जन कामाची नुकतीच पाहणी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, नगर अभियंता दिलीप चित्रे व पदाधिकाऱ्यांनी केली.

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. नगरपालिकेने जाहीर केलेल्या कृत्रिम तळ्यांमध्येच नागरिकांनी गणेश विसर्जन करावे. गणेश भक्तांनी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

– दिलीप चित्रे
नगर अभियंता, सातारा पालिका

पहा व्हिडिओ :  ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT