सातारा

सातारा : बाजूला सरका म्हटल्याने ढाब्यासमोर राडा

अनुराधा कोरवी

सातारा : पुढारी वृत्तसेवा: वाढे फाटा येथे राजधानी ढाब्यासमोर 'बाजूला सरका' असे म्हटल्याच्या कारणावरुन तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिरोज हेळवाकर, शुभम कांबळे, असिम शेख (पूर्ण नावे माहित नाहीत. तिघे रा. सदरबझार) अशी संशयित आरोपींची नावे असून याप्रकरणी समीर राजेंद्र सोनवणे (वय 39, रा.करंजे तर्फ दौलतनगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 रोजी घडली असून संशयितांनी लाथा-बुक्क्यांनी मारहण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT