सांगली

सांगली : साथ, पूर, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा

मोनिका क्षीरसागर

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संभाव्य साथ, पूर, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. दोन आपत्कालीन नियंत्रण कक्ष, आरोग्य केंद्रनिहाय दहा कक्ष आणि नऊ वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली.

पावसाळा पूर्वतयारी, पावसाळा कालावधीतील तयारी व पावसाळ्यानंतरची तयारी असे तीन भाग करून उपाययोजना व विभागनिहाय जबाबदार्‍या निश्‍चित केल्या आहेत. दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीतील साथ, पूर व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.सर्व दवाखान्यांना लागणारा औषधसाठा दि. 20 मे पर्यंत उपलब्ध करून दिला आहे. मेडिकल स्टोअरला औषधसाठा उपलब्ध आहे.

संभाव्य पूरबाधित भागातील घरांची संख्या 31 हजार 429 आहे. लोकांची संख्या 1 लाख 76 हजार 418 इतकी आहे. पावसाळाच्या वेळी घरोघरी जाऊन साथरोगांसंदर्भात काळजी घेतली जाईल. तीन साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आली आहेत. साथरोग नियंत्रण कक्षामध्ये सर्व वैद्यकीय साहित्य उपलब्ध केले आहे, अशी माहिती डॉ. आंबोळे यांनी दिली.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT