सांगली

सांगली : खुनातील संशयिताचा रुग्णालयात धिंगाणा

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील कॉलेज कार्नरजवळील कॅफेसमोर गुंड नवनाथ लवटे याचा संशयित योगेश दिलीप शिंदे (वय 25, लक्ष्मी मंदिरजवळ, हडको कॉलनी) याने नशेतच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्याने त्याठिकाणीच धिंगाणा घातला. त्याच्यावर त्या ठिकाणीच उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नशेतून बाहेर आल्यानंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती अशी, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकी रस्त्यावरील उत्तर शिवाजीनगरमध्ये एका कॅफेच्या समोर रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ लवटे याचा धारदार गुप्तीने हल्ला करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. हल्ल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी रेकॉर्डवरील गुंड योगेश शिंदे याला ताब्यात घेतले. तेव्हा तो नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेंव्हा त्याने तेथे नशेत धिंगाणा घातला. पोलिस पथकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु नशेचा अंमल असल्यामुळे त्याने आदळआपट करण्याचा प्रयत्न केला. तो लवकर शुद्धीवर यावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर होती. परंतु तो आजही नशेच्या अंमलाखाली होता. तो नशेतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतरच तपास करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आज दुसर्‍या दिवशीही खुनाचे कारण गुलदस्त्यातच राहिले. शुद्धीवर आल्यानंतरच न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, नवनाथ याच्या खुनानंतर त्याचा भाऊ गोरखनाथ लवटे यांने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयितासाठी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त

संशयित शिंदे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री त्याने रुग्णालयातच धिंगाणा घातला पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या ठिकाणाच्या वॉर्डाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT