शिराळा; पुढारी वृत्तसेवा- शिराळा तालुक्यात वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
शिराळा येथील उर्दू शाळेत वृत्तपत्र विक्रेते दता पाटील. अनिल नांगरे यांचा सत्कार मुख्याध्यापक मुश्ताक अब्दुलकरीम मोमीन यांनी केला. यावेळी मुलांनी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन केले. मांगले येथील जिल्हा परिषद शाळा १ व २ मध्येही दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन करण्यात आले. मुख्याध्यापक सौ. आशा विठ्ठल नलवडे व मुख्याध्यापक विश्वास वरेकर यांनी वृत्तपत्र एजंट प्रदीप मोहरेकर यांचा सत्कार केला. चरण येथील जिल्हा परिषद शाळेत व श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये वृत्तपत्र एजंट यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा :