सांगली

Annasaheb Patki | सांगली: ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पत्की यांचे निधन

अविनाश सुतार

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब उर्फ यशवंत शंकर पत्की (वय ८७)  यांचे नुकतेच  निधन झाले. खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा निर्माण करत आपल्या राजकीय जीवनामध्ये सुसंस्कृत व स्पष्टवक्तेपणा अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. करगणी गावचे सलग २८ वर्ष सरपंच, आटपाडी पंचायत समितीचे सभापती,  १० वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य या आणि अन्य विविध पदावर त्यांनी काम केले होते. Annasaheb Patki

निंबवडे गावाचे रहिवासी  असलेल्या अण्णासाहेब करगणी यांनी राजकीय व सामाजिक जीवनामध्ये आपला ठसा उमटवला होता. भिन्न जाती, जमाती, वंचित, उपेक्षित, मागास, बहुजनांमध्ये अनेक दशके निस्वार्थी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जायचे. Annasaheb Patki

क्रांतिवीर डॉ.  नागनाथआण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार स्व. राजारामबापू पाटील, स्व.बाबासाहेब देशमुख,  माजी आमदार स्व.आण्णासाहेब लेंगरे, माजी आमदार स्व. हणमंतराव पाटील,  माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार स्व. अनिल बाबर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री स्व. आर आर पाटील, स्व. माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा जवळून स्नेह अण्णासाहेब पत्की यांना लाभला होता. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT