Lok Sabha Election 2024 : चंद्रहार पाटलांना ‘सांगली’ची उमेदवारी जाहीर; उद्धव ठाकरेंची घोषणा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : चंद्रहार पाटलांना 'सांगली'ची उमेदवारी जाहीर; उद्धव ठाकरेंची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत आज त्यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना  पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या सभेत जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर आता सांगलीच्या राजकारणाला नवे वळण मिळणार का अशी चर्चा आहे.

महाविकासआघाडीच्या लोकसभेबाबतच्या जागा वाटप अद्यापही अंतिम झालेल्या नाहीत. मात्र या जागावाटपापूर्वीच मिरजेत शिवसेनेचा जनसंवाद मेळावा आज (दि. २१ मार्च) आयोजित  करण्यात आला होता. या मेळाव्या दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब देखील झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी सभे कार्यकर्त्यांना मार्गदर्शना करताना ही उमेदनारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूरच्या बदली सांगलीच्या जागेवर ठाकरे शिवसेनेने हक्क सांगत असताना पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आले होते.

लोकसभा उमेदवारीवर चंद्रहार पाटील पहिल्यापासून ठाम

लोकसभेच्या आखाड्यात उतरणार यावर चंद्रहार पाटील पहिल्यापासून ठाम आहेत. गेल्या वर्षभरापासून ते लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा अगोदरच व्यक्त केला होता.

Back to top button