सांगली

सांगली : ट्रॅक्टर-मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच ठार

backup backup

शिराळा, पुढारी वृत्तसेवा : अस्वलेवाडी येथे ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. संतोष शिवाजी कनुंजे ( वय ४०) हा जागीच ठार झाला. तर सागर नागेश माळी ( वय २७, रा.खेड) हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना बुधवारी (दि.१६) सायंकाळी ४:३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रवीण काशिनाथ साठे (वय ३९, रा.वाटेगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष कनुजे व सागर माळी हे मोटरसायकल (एम. एच. १० सीसी ७३९६) वरून कोकरूडकडून शिराळा येथे येत होते. तर ट्रॅक्टर शिराळाकडून कोकरूडकडे निघाला होता. दरम्यान अस्वलेवाडी येथे ट्रॅक्टरने चुकीच्या बाजूने जाऊन मोटारसायकल धडक दिली. यामध्ये संतोष कनुंजे हा जागीच ठार झाला, तर सागर नागेश माळी हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT