आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : धर्मपरिवर्तनाचे मोठे रॅकेट आटपाडी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. हे रॅकेट उध्वस्त करावे. हिंदु धर्माच्या भावना लक्षात घेवून आटपाडी येथील ख्रिस्ती धर्म प्रसारक गेळे दांपत्याला अटक करून कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना आटपाडी तालुका बंद ठेवून भव्य महामोर्चाचे काढू असा इशारा वीर मराठा मावळा संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात आटपाडी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरद हॉस्पीटलमध्ये रुग्णावर जादूटोणा व भोंदुगीरीने उपचार करून धर्मांतराचा प्रयत्न झाला. संजय गेळे व अश्वीनी गेळे हे दोघे असे अनेक प्रकार सुशांत ढाबा व त्याच्या पाठीमागे बाजूस असलेला चर्चमध्ये वारंवार करतात.
रुग्ण आणि गरीब लोकांना अमिष दाखवून त्यांना धर्मातर करणेस प्रवृत करत असलेल्या चर्चा वारंवार ऐकण्यास येत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये गेळे दांपत्य व अनोळखी व्यक्तीसह एक महिला गुडघ्यावर बसून प्रार्थना करताना दिसतात. त्यात हे लोक आटपाडी, जत, सांगोला हे तालुके व्यापून टाकणार असे म्हणतात. धर्मपरिवर्तनाचे हे काम पूर्ण महाराष्ट्रात पसरले असावे.
तरी पोलीसांनी या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कडक करावी अन्यथा आटपाडी बंद ठेऊ आणि महामोर्चाचे आयोजन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी नांगरे पाटील, संपत पाटील, सम्राट देशमुख, अतुल गायकवाड, प्रकाश पाटील, सोमनाथ देशमुख, अमित ऐवळे, प्रदीप पवार, सुजित भोसले व कार्यकर्त्यांनी दिला.
हेही वाचा