

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : विभुतवाडी येथे पुलाचा कठडा तोडून उसाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम.एच. १३ ए ७४३०) ट्रॉली सह ओढा पात्रात कोसळला. दुपारी घडलेल्या या घटनेत ऊस, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचे दोन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-पंढरपूर रस्त्यावरील विभुतवाडी गावाच्या पश्चिमेला ओढ्यावर पुल आहे. या पुलाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलावरून कोसळला. या घटनेत ऊस आणि वाहनाचे दोन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना हे वळण काढावे अशी अनेक वेळा मागणी केली आहे. या पुलाच्याजवळ अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे हे वळण काढावे पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावेत अशी मागणी होत आहे.
या पुलावर या वर्षांमध्ये सात ते आठ अपघात झाले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यु आकाराचे वळण असल्याने ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे कधी उघडणार असा सवाल लोक करत आहेत.
.हेही वाचा