आरोपी अविनाश मोरे, म़त महेश मोरे 
सांगली

Sangli News : कापरी येथे पैशाच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

अविनाश सुतार

शिराळा, पुढारी वृत्तसेवा :  कापरी (ता शिराळा) येथे पैशाच्या वादावादीतून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केला. ही घटना आज (दि. १२) एकच्या दरम्यान घडली. महेश राजेंद्र मोरे (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. Sangli News

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, मृत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे, (मूळगाव हालोंडी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) सध्या रा. कापरी (ता. शिराळा) हे आईसह लहानपणापासून आजोळी मामा व आजीकडे कापरी (ता. शिराळा) येथे राहत होते. तर वडील गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. मयत महेश व अविनाश दोघांमध्ये पैसे देवघेवी वरून वारंवार भांडणे होत होती. दोघे ही सेट्रिंगवर कामावर जात होते. Sangli News

मृत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती. पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे काढत असे. याच कारणावरून अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण लागले. घरासमोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेश याच्या डोक्यात लाकडी दांडके घातले. यामध्ये  महेश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. डोक्याला गंभीर मारहाण झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

‌महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. याबाबत फिर्याद पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील करत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT