सांगली : घरगुती वादातून वृद्धाने केला पत्नीचा खून; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा रचला बनाव

सांगली : घरगुती वादातून वृद्धाने केला पत्नीचा खून; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा रचला बनाव

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत मुलाकडे दिवाळीसाठी दोघे एकत्रित जाण्याच्या वादातून तानाजी बापू पाटील (वय 74) याने पत्नी लतिका तानाजी पाटील (65, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांचा तोंडावर उशीने दाबून खून केला. पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा त्यांचा बनाव कवठेमहांकाळ पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणला. 8 नोव्हेंबरला ही घटना घडली. पतीला अटक केली आहे. त्यांचा मुलगा प्रवीण तानाजी पाटील (रा. झंकार सोसायटी, विजय कॉम्प्लेक्स भाईंदर पूर्व मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.

काही दिवसांपासून पाटील दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. लतिका पाटील यांचा मुलगा प्रवीण मुंबईत नोकरीनिमित्त
स्थायिक आहे. लतिका या पतीसोबत मुलाकडे दिवाळीला मुंबईस जाण्यास तयार नव्हत्या. यातून त्या सातत्याने चिडचिडेपणा करून पतीसोबत वाद घालून भांडण करीत होत्या. पत्नीपासून होणार्‍या त्रासाला कंटाळून तानाजीने लतिका यांना मारहाण करून खाली पाडले. त्यांच्या तोंडावर उशीने दाबून त्यांचा खून केला. घटनेनंतर त्याने पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव केला व अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला.

लतिका पाटील यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला नसून त्यांचा पतीने खून केल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील निवृत्ती करांडे आणि नागेश मासाळ यांना मिळाली. पोलिसांनी तानाजीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने खून केल्याची कबुली दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news